Views
*पुरंदर मधील लपतळवाडी येथे तुळजाभवानीमातेचे मंदिर उभे राहत असून या अनुषंगाने तुळजापूर येथे 150 ग्रामस्थांनी देव भेट निमित्त भवानी दर्शन करून परिक्रमा पूर्ण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

पुरंदर मधील लपतळवाडी येथे तुळजाभवानीमातेचे मंदिर उभे राहत असून त्या अनुषंगाने देव भेट कामी तेथील संघ पुरंदर तालुका धर्माचार्य दिलीप कदम संपर्क प्रमुख, सरपंच सुवर्णा सतीश कदम, रामदास नारायण पिलाने यांच्यासह तुळजापूर येथे 150 ग्रामस्थांनी देव भेट निमित्त भवानी दर्शन करून परिक्रमा पूर्ण केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर चे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी देवी मूर्तीचे पूजन करून सर्व ग्रामस्थांचा स्वागत केले. यावेळी नगर अध्यक्षांच्या सहकार्याने समस्त सर्व 150 देवीभक्तांना चहा, नाष्टा ची सोय करण्यात आली होती. यावेळी प्रदेश पदाधिकारी मीनाताई सोमाणी, रुग्णकल्याण समिती सदस्य आनंद कंदले, सचिव गुलचंद व्यवहारे, श्रीनाथ काका शिंदे, सागर कदम, राम चोपदार, सुरज शेरकर, गणेश एडके यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
 
Top