Views





*जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन मूग उडीद यांना भाव मिळत नसल्याने मनसेने केली होळी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५००००/- रुपयाची दोन दिवसात मदत देण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन व उडीद पिकाची होळी करुन शासनाचा निषेध करण्यात आला. उस्मानाबाद जिल्हयातील सर्वच खरीपाची पिके अतिवृष्टी पावसामुळे नष्ट झाली आहेत. अनेक नदीकाठच्या गावात पाणी शिरुन घरांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची जनावरे, शेतकन्यांचे शेतातील ठिपक सिचने इतर साहित्य पुरात वाहून गेले आहेत. त्या पुरात अनेक जणांचा बळी गेला आहे. याबाबत शासनाकडे वेळोवेळी निवेदन देवून पंचनाम्याची वाट न बघता शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली होती. परंतू शासनाने याची दखल घेतली नाही. अशा नाकारत्या शासनाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकसान झालेल्या शेतकन्याच्या सोयाबीन, उदीड पिकाची होळी करून शासनाचा जाहिर निषेध करण्यात आला. शासनाने आमच्या या निवेदनाची तात्काळ दखल घेवून येणाऱ्या चार दिवसात शेतकन्याच्या व नुकसानग्रस्ताच्या बँक खात्यावर सरळ मदत हेक्टरी ५० हजार रुपये जमा करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हयातील कृषी अधिकाऱ्यांना व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच दालनात रोखून धरण्यात येईल, यावेळी काही अनुचित घडल्यास याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, मनशिसे जिल्हाध्यक्ष राहूल बचाटे, कळंब तालुका सचिव गोपाळ घोगरे, जिल्हाध्यक्ष वैशालीताई गायकवाड, मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, उस्मानाबाद ता.सचिव शिवानंद ढोरमारे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोंदर, उस्मानाबाद तालुका सचिव दादा वाघे, कळंब तालुकाध्यक्ष सागर बारकुल, उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार, बेंबळी शहराध्यक्ष रामभाऊ मोटे, यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top