Views

*तुळजापुरच्या श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 8 ते 21 ऑक्टोंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव 21 ऑक्टोंबर पर्यंत साजरा होणार आहे.नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहरामध्ये भाविकांची मोठया प्रमाणावर गर्दी होते.तसेच उस्मानाबाद, लातूर, नळदुर्ग,सोलापूर, उमरगा, हुमनाबाद, गुलबर्गा, बिदर या ठिकाणाहून भाविक पायी चालत येण्याची परंपरा आहे.19 आणि ऑक्टोंबर या दिवशी कोजागिरी मंदिर पौर्णिमा निर्मित्त महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश,तेलंगणा राज्यातून लोखोंच्या संख्येने भाविक पायी येत असतात.अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवू नये,भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये या करिता भाविक पायी चालत येणारे मार्गावरील अवजड वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे. दि.8ऑक्टोंबर रोजीचे 00.01 ते दि.21 ऑक्टोंबर रोजीचे 24.00 वाजे दरम्यान पुढील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनास ( Heavy Vehicles) मनाई करण्यात आली आहे. उस्मानाबाद ते हैद्राबादकडे जाणारी अवजड वाहतूक उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा मार्गे हैद्राबादला जाण्यास मनाई करण्यात आली आहे.या अवजड वाहतुकीस औासा, उमरगामार्गे हैद्राबादकडे जाता येईल. हैद्राबाद ते उस्मानाबादकडे येणाऱ्या वाहतुकीस उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, उस्मानाबाद या दरम्यान मनाई करण्यात आली आहे.ही वाहतूक हैद्राबाद, उमरगा, औसा मार्गे हैद्राबादहूनऔरंगाबादकडे जाणाऱ्या वाहतुकीस उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, उस्मानाबाद, येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात आली आहे.या वाहतूकीस उमरगा, औसा, लातूर, अंबाजोगाई, मांजरसुंबा, बीड मार्गे औरंगाबादकडे जाता येईल.औरंगाबाद ते हैद्राबादकडे जाणाऱ्या वाहतुकीस येरमाळा, उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. या वाहतुकीस औरंगाबाद, बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाई, लातूर, औसा, उमरगा मार्गे हैद्राबादकडे जाता येईल. ही बंधने पोलीस,रुग्ण सेवा,अग्निशमन दल यांच्या वाहनास आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना,हलकी वाहने (Light Vehicles) आणि एस.टी.बसेसला लागू राहणार नाही.असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि पोलिस अधीक्षक नीवा जैंन यांनी कळविले आहे.
 
Top