*परंडा तालुक्यातील टाकळी येथील लहान
मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात
रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, या
आंदोलनास परंडा तालुका व शहर
भाजपाच्या वतीने पाठिंबा*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
परंडा तालुक्यातील टाकळी येथील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजीतसींह ठाकुर साहेब यांच्या आदेशाने परंडा तालुका व शहर भाजपाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला. यावेळी आर.पी.आय आठवले गटाचे राज्य सचीव संजयकुमार बनसोडे, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अॅड.जहिर चौधरी, वडार महाराष्ट्र महाराष्ट्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अवीनाष विटकर, यांच्यासह जनसमुदाय उपस्थित होता.