*जनआक्रोश आंदोलनात उस्मानाबाद जिल्हयातून
मोठया संख्येने सहभागी व्हावे - रामदास कोळगे*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे मनुष्यहानीसह, जनावरेही दगावली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतक-यांना मरण यातनांना सामोरे जावे लागते आहे. या परीस्थितीतुन शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार भरघोस मदत करेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामळे उस्मानाबाद जिल्हयातुन मोठया संख्येने राज्यशासनाच्या विरोधात क्षीण झालेल्या शेतकऱ्यांचा शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी उपस्थित रहावे असे, आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी विरोधी, निष्क्रीय सरकारच्या निषेधार्थ व सरसकट वाढीव मदतीच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने दि.२१ आक्टोबर २०२१ रोजी दु.११.३० वाजता मराठवाडा विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा.वासुदेवराव काळे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जनआक्रोश आंदोलनात सहभागी होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतक-यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य नाना यादव व जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.