Views*खा.शरदचंद्रजी पवार यांचे पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यास कटिबद्ध - प्रा.डॉ.संजय कांबळे* 

कळंब /प्रतिनिधी


 खा.शरदचंद्रजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या कार्यक्रमातुन शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार तळागाळातील वंचित घटकापर्यंत पोहचविण्यासाठी व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी माझ्यावर पक्षाने सामाजिक न्याय विभाग मराठवाडा अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली आहे.ही जबाबदारी पार पाडण्यासाठी संघटनात्मक कामासाठी पूर्ण मराठवाठयात बैठका घेणार असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.संजय कांबळे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग मराठवाडा अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. संजय कांबळे यांची नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग तालुका कळंबच्या वतीने दि.२८ ऑक्टोबर रोजी डिकसळ येथील भारत नगर येथील "पंचशीला निवास"येथे करण्यात आले होते.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,शहराध्यक्ष मुसद्देक काझी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा शिराढोण सरपंच पद्माकर पाटील,विजय गायकवाड,कार्याध्यक्ष उमेश मडके, सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष भाऊसाहेब कुचेकर, तालुका कार्याध्यक्ष राहुल कसबे,सरचिटणीस सुमित रणदिवे, बापू सावंत, शहराध्यक्ष संघर्ष कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई मस्के,जिल्हा सचिव पंचशीला वाघमारे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सलमा सौदागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके यांनी केले तर आभार सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष किरण मस्के यांनी मानले.
 
Top