Views


*भाजपा उस्मानाबाद यांच्या वतीने पालकमंत्री गडाख यांना ‍जिल्ह्याच्या पिक विम्यासाठी ‍निवेदन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद येथे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना शेतक-यांना २०२० मधील प्रलंबीत पिक विमा व २०२१ मधील २५% अग्रीम पिक विमा मिळावा यासाठी जिल्हा विभागीय व राज्यस्तरावर विमा प्रतिनिधीच्या उपस्थीतीत बैठक घेण्याची तरतुद आहे, अशी बैठक घेण्यात यावी असे निवेदन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वखाली उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.शंकरराव गडाख यांना भाजपाचे ‍ पदाधीकारी व शेतकरी बांधव यांच्या उपस्थीतीत देण्यात आले. उस्मानाबाद जिल्हयात मागील सलग तीन वर्षे अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. सन २०१९ साली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पोटी सरसकट विमा भरपाई मिळाली परंतु २०२० साली झालेल्या नुकसान भरपाई पासुन ८०% शेतकरी आज ही वंचित आहे. या वर्षी तर अतिवृष्टीने कहरच केला आहे. सुरुवातीला पावसातील खंडामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर उरले सुरले अतिवृष्टीने. जिल्हाधिकारी साहेबांनी खरीप २०२१ च्या नुकसानी पोटी २५% अग्रीमचे आदेश काढले खरे परंतू प्रत्यक्षात अग्रीम मात्र मिळालीच नाही. पिक विमा कंपनी यासाठी असमर्थता दर्शवत असल्याचे समजते. दोन वर्षांचे लॉकडाऊन, शेतीमाल खरेदीत राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन न मिळालेली अतिवृष्टीची भरपाई यामुळं शेतकरी बांधवांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. पीक विम्याच्या रकमेकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत कारण पीकविमा देणं हे या कंपन्यांचं कर्तव्य आहे आणि पिकविमा हा शेतकऱ्यांचा अधिकार. या अनुषंगाने जिल्हायातील शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याकडे अनेक निवेदने देण्यात आलेली आहेत. अशा तक्रारींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णय व करारामध्ये तालुका व जिल्हा स्तरावर समित्या स्थापन केलेल्या असुन आपल्या अध्यक्षतेखाली (जिल्हयाचे पालकमंत्री या नात्याने) जिल्हास्तरावर योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावरील विमा प्रतिनीधींच्या उपस्थीतीत बैठक घेण्याची तरतुद आहे. २०२० मध्ये ८०% शेतकरी प्रलंबीत पिकविमा मिळणे बाबत व २०२०-२०२१ मधील २५% अग्रीम पिकविमा देणे बाबत आपण तातडीने बैठक आयोजीत करुन न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद व जिल्हयातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी ‍जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲङ.नितीन भोसले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, भाजपा नेते विनोद गपाट, नामदेव नायकल, दाजीआप्पा पवार, तात्यासाहेब देशमुख, शिवाजी गिड्डे, गणेश मोरे, हनुमंत माने, गणेश देशमुख, यांच्यासह भाजपाचे पदाधीकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
 
Top