Views




*ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


ईद-ए-मिलादुन्नबी ( पैगंबर जयती ) निमित्त उस्मानाबाद शहरातील हजरत खाजा शम्शोद्दीन गाझी दर्गा समोरील ताज चौक येथे अजहर चांद मुजावर ग्रुप व गाजी ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस आधिक्षक ips नवनित कावंत व उस्मानाबाचे आमदार कैलास पाटील, उपस्थित होते. 
 कोरोणाला दूर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरुन घ्यावे तसेच या ग्रुपने जसे आज रक्तदान घेतले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम हाती घेऊन परिसरातील 100% लसीकरण करून घ्यावे व लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. आमदार कैलास पाटील यांनीही बोलताना लसीकरणावर भर दिला अझहर मुजावर मिञ मंडळ व गाजी ग्रुपच्या वतीने होत असलेल्या राक्तदान शिबिराचे कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी गाजी ग्रुपचे बाबा फैजोद्दीन यांनी प्रस्तावना केली ए सी एम ग्रुप मागील गेल्या नऊ वर्षापासून रक्तदान शिबिर शिवजयंतीनिमित्त व ईदमिलादून्ननबी च्या वेळी घेत आहोत तसेच गोरगरिबांना अन्न वाटप करणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य करणे व रुग्णांना सहकार्य करणे कोरोणा काळामध्ये अनेक रुग्णांना सहकार्य केले हे सर्व माहिती बाबा फैजोद्दीन यांनी दिली. व रक्तदात्यांना थंडीपासून बचाव करणारे स्वेटर भेट म्हणून सोबत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यावेळी मिलाद कमिटीचे अध्यक्ष अफजल निजामी , राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मसुद शेख, संजय निंबाळकर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पु मुंडे, नगराध्यक्ष मंकरद राजे निबाळकर, काँग्रेस पक्षाचे उमेश निंबाळकर, नगरसेवक बाबा मुजावर, राजाभाऊ शेरखाने, डॉ. प्रतापसिंह पाटील, कादर खान, जफर रब्बानी शेख, शहर पोलिस निरीक्षक बुधवंत, डॉ.शकिल खान, अझहर मुजावर, आयाज (बबलु )शेख, बिलाल तांबोळी, अफरोज पिरजादे, वाजिद पठाण, प्रविण कोकाटे, रेहान मुजवार, अदीब काजी, इलयास मुजवार, तौफीक शेख, शेख अमीर, आरिफ मुजवार, जमीर शेख, रियाज शेख, बबलु शेख, इम्रान मुजवार, शहबाज मुजवार, पत्रकार सलीम पठाण, आसेम काझी, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top