Views

*जगदंबा मंदिर ट्रस्ट लोहारा यांच्या संयुक्त विधमाने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 
लोहारा येथे श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट च्या वतीने नवरात्र महोत्सव साजरा केला जातो,मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे ,पोलीस दलाचे नियमाचे पालन करून अगदी साध्ये पणाने साजरा केला जात आहे, यानिमित्ताने दहा दिवस भरगच्च उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये कै, डॉ.चंद्रकलादेवी पद्सिंह पाटील यांच्या स्मरनार्थ व जगदंबा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन दि 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. यात प्रथम पारितोषिक 31 हजार व चषक मा.आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने, दुतीय पारितोषिक 21 हजार व चषक, सौ.शितलताई राहुल पाटील ( जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद व श्री राजेंद्र पाटील भाजप तालुकाध्यक्ष लोहारा ) यांच्या वतीने व तृर्तीय पारितोषिक 11 हजार व चषक हाजी अमीन यासिन सुबेकर यांच्या वतीने तर चतूर्थ 7 हजार व चषक श्री दिनकर (पापा)जावळे अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था लोहारा. यांच्या वतीने देण्यात येणार आहे. ह्या क्रिकेट चषकाचे स्पर्धाचे ठिकाण चाऊस मैदान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह समोर, हिप्परगा रोड लोहारा येते करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संपर्क:- सचिन कोळी 9970041249, अनिल बोदमवाड 8329589623, चाँद शेख 7774845158 
 आयोजक जगदंब क्रिकेट क्लब लोहारा. विशाल कोकणे, रियाज खडीवले. विशेष सहकार्य :- श्री दीपक भैय्या जवळगे ( जि.प. सदस्य उस्मानाबाद. ) श्री. के. डी.पाटील (काँग्रेस शहराध्यक्ष लोहारा ) श्री माणिक (नाना) चिकटे. मंगेश कदम, दादा पाटील, आयुब शेख, प्रणव गिरी, महेश घोटाळे, सागर गिरी, याच्या वतीने प्रत्येकी 2100 रु वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top