*श्री तुळजाभवानी देवीजींचे मुरली अलंकार महापूजेचे मनोहारी रुप*
उस्मानाबाद/प्रतिनिधी:-
शारदीय नवरात्र महोत्सवात रविवार चौथ्या माळेच्या दिवशी ललित पंचमी निमित्त श्री देवीजींची नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे .
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. तिस-या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 11 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 12 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 13 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (शनिवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
तत्पूर्वी रात्री तिस-या माळेच्या दिवशी या वेळी उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार, पुजारी बांधव यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात गरूड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.