Views


*संस्कारक्षम शिक्षणाचा ओढा कमी झाला असल्याची खंत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर उद्योग समूहाचे चेअरमन प्रा. हणुमंत मडके*


कळंब/प्रतिनिधी


 सध्या पदव्या घेऊन नौकरी मिळविणे व त्यातून अर्थार्जन करण्याच्या पाठीमागे सर्वजण लागले असुन संस्कारक्षम शिक्षणाचा ओढा कमी झाला असल्याची खंत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर उद्योग समूहाचे चेअरमन प्रा. हणुमंत मडके यांनी कळंब तालुका पत्रकार संघाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.
  
         यावेळी ज्ञानपिठावर ह. भ. प .महादेव महाराज आडसुळ, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, पुरस्काराथी गजानन पाटील, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील,सौ. सरस्वती ताई आडसुळ आदी उपस्थित होते.
येथील ज्ञानेश्वर बालकाश्रमात हा कार्यक्रम संपन्न झाला. पुढे बोलताना मडके म्हणाले की शिक्षकांचे कार्य हे सर्वव्यापी असुन शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा सोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्काराचे मुल्य रूजविणे काळाची गरज असुन मुल्य रूजविणारया शिक्षकांना शोधून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येत आहे. हे कार्य कौतुकास्पद असुन अशा उपक्रमामुळेच कळंब तालुका पत्रकार संघाचे महाराष्ट्रात नावलौकिक आहे. संघाच्या सामाजिक उपक्रमास आमचा उद्योग समूहाच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रत्येक व्यक्तीला व समुहाला समाजाचे काही देणे आहे आणि याची सतत जाणीव करून देण्याचे काम कळंब तालुका पत्रकार संघ करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले तर सुत्रसंचालन परमेश्वर पालकर तर आभार बालाजी सुरवसे यांनी मानले. यावेळी माधवसिंग राजपूत व डी. के. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी निरफळ, मुसतान मिर्झा, ॐकार कुलकर्णी, रमेश अंबिरकर,बालाजी सुरवसे, प्रदीप यादव, शिवाजी सावंत,रमेश रीतापूरे, दीपक माळी, मुख्याध्यापक मुकुंद नांगरे, प्रशांत घुटे आदी उपस्थित होते. 

चौकट ....
.......

कर्मभूमीतील पुरस्कार अविस्मरणीय - पाटील
माझी जन्मभूमी कोल्हापूर जिल्ह्यातील असली तरी माझी कर्मभूमी कळंब येथील आहे येथील लता मंगेशकर शाळेत मी गेल्या अठरा वर्षापासून ज्ञानदानाचे मनापासुन कार्य करत आहेत. माझे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उचपदावर कार्यरत आहेत. या कष्टाचे फळ मला आज या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाले असुन मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे करत राहील असे अशवासन गजानन पाटील यांनी दिले.

 
Top