*हेरवाड ते कंगणोळी 240 कोटी निधी असणाऱ्या राजपथ रस्ता नवीन चालू असतानाच रस्त्यावर भेगा*
मिरज-
हेरवाड ते कंगणोळी 240 कोटी निधी असणाऱ्या राजपथ रस्ता नवीन चालू असतानाच रस्त्यावर भेगा पडून खड्डे तयार होत आहेत,रस्ता पूर्ण पणे निकृष्ट दर्जाचा केला आहे प्रशासनाला जाग येण्यासाठी राष्ट्र विकास सेनेच्या वतीने टाकळी रस्त्यावर दि. १८ ऑक्टोंबर रू सकाळी 11 राष्ट्र विकास सेनेच्या वतीने वाजता निदर्शने करून रस्त्यावर रांगोळी काढून रस्त्याची फुले वाहून गुलाल उधळून,अगरबत्ती लावून पूजा करून आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाचा वेळ काळ आणि पैसे खर्च करणारे अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांतभाऊ सदामते यांनी केली आंदोलनात प्रशासन व ठेकेदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात, मा कु ऐश्वर्या कोळी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष,मा.शशिकांत दुधाळ सचिव सांगली जिल्हा,मा महेश महाजन,मा सारिका जमदाडे महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष, मा सिताराम वाघमारे मिरज तालुका अध्यक्ष, ज्योती सरगर सां मि कु महानगरपालिका क्षेत्र युवती अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी टाकळी रस्त्यावर निदर्शने करते वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.