Views


*श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट उस्मानाबाद चा दहावा वर्धापन दिन व सिध्दीविनायक मोबाईल बँकिंग सेवेचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न.*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट उस्मानाबाद चा दहावा वर्धापन दिन व श्री सिध्दीविनायक मोबाईल बँकिंग सेवेचा अनावरण सोहळा दि.20 ऑक्टोंबर 2021 रोजी उत्साहात संपन्न झाला. सदरच्या मोबाईल बँकिंग सेवेचे अनावरण उस्मानाबाद शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.श्री.अभय शहापूरकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.श्री.राजेंद्र धाराशिवकर, अॅड.श्री.रामचंद्र गरड, श्री.विष्णुदास सारडा, श्री.लक्ष्मीकांत जाधव, श्री.सुधीर सस्ते, डॉ.श्री. सुधीर शिंदे, डॉ.श्री.मनोज देव्हारे, श्री.गिरीश हंबीरे, श्री.मनोज कोचेटा, श्री.नितीन भोसले, प्रा.श्री. गजानन गवळी, श्री.प्रविण प्रजापती (सी.ए.), संस्थेचे अध्यक्ष श्री.व्यंकटेश (बालाजी) कोरे, संचालक श्री.सतीश सोमाणी, श्री.विशाल रोचकरी आदी मान्यवर व श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे अधिकारी, कर्मचारी व सिध्दीविनायक परिवाराचे हितचिंतक व संस्थेचे खातेदार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी संस्थेचा लेखाजोखा व संस्थेची एकूण कार्यपद्धती मांडली. अध्यक्षीय भाषणात डॉ.अभय शहापूरकर यांनी संस्थेच्या या नूतन मोबाईल बँकिंग सेवेचा सर्व सभासदांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे ज्यामुळे आपला वेळ वाचेल व ही सुविधा अत्यंत महत्वाची आहे असे प्रतिपादन केले. तसेच संस्थेच्या एकूण वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.प्रतीक देवळे यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक श्री.सचिन मिनियार यांनी मानले.
 
Top