Views



*दस्तापूर येथे जगदंबा मंदिर येथे आनंदोत्सव 
साजरा, शारदीय नवरात्रौत्सव उत्सवला 
सुरूवात*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकारने सर्व मंदिरे खुली केली आहेत. मंदिरे दर्शनासाठी भाविकांसाठी खुली झाल्याने लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी नवरात्रौत्सव मोठ्या भक्तिभावाने तसेच कोरोना सर्व नियम पाळुन साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येत आहेत. यावेळी जगदंब प्रतिष्ठानचे तमानप्पा बिराजदार, रतन स्वामी, शिवाजी चव्हाण, बालाजी मदने, आप्पाराव गडदे, जयेश सुर्यवंशी, नानासाहेब गडदे, रत्नदीप बिराजदार, प्रदीप बिराजदार , मंगेश चव्हाण , चेतन वाकळे, गणेश गडदे, शिवानंद डिग्गे, नागेश कारले, यांच्यासह जगदंब प्रतिष्ठानचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top