*''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब याठिकाणी कायदेविषयक जागरूकता शिबीर संपन्न...*
कळंब/प्रतिनिधी
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विधीज्ञ मंडळ कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' निमित्ताने भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) चा एक भाग म्हणून दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२१ रोजी दिवाणी न्यायालय क. स्तर कळंब या ठिकाणी NALSA योजनांविषयी जागरूकता, Under Trial Prisoners व आरोपींच्या हक्कांविषयी जागरूकता, महिलांचे अधिकार, वैकल्पिक वाद निवारण यंत्रणेविषयी जागरूकता (Awareness on NALSA schemes, Awareness about rights of UTP/accused, Rights of women, awareness about ADR mechanisms) या विषयावर माहिती देण्यासाठी कायदेशीर जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील शिबीरामध्ये सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महंतेश कुडते यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत असलेल्या विविध योजनांसंबंधी बहुमुल्य अशी माहिती सर्व उपस्थितांना देऊन सदरील योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळेल यासाठी जागरूकता शिबीराची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे याचे महत्त्व पटवून दिले. तसेच अॅड. श्री. एस. आर. आगलावे यांनी वैकल्पिक वाद निवारण यंत्रणेविषयी उपस्थितांना माहिती देऊन लोकन्यायालयाचे महत्त्व पटवून दिले. तसेच अॅड. एस. आर. फाटक मॅडम यांनी जागरूकता शिबीराच्या अनुषंगाने महिलांचे काय अधिकार आहेत? त्यासाठी कोणत्या प्रकारे विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत मिळविता येते, तसेच महिलांसाठी असलेल्या विविध सोयी-सवलतींबाबत माहिती दिली. तर Under Trial Prisoners व आरोपींच्या हक्कांविषयी अॅड. श्री. ए. एन. ढेपे यांनी सविस्तर माहिती शिबीरामध्ये दिली. सदरील कार्यक्रमाचे सूत्र संचलन अॅड. श्री. बी. बी. साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विशाल दुगाने यांनी केले. सदरील शिबीरासाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्रीमती आर. आर. कुलकर्णी तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे सदरील कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी सहाय्यक अधीक्षक विष्णू डोके, वरिष्ठ लिपीक सुनील परदेशी, कनिष्ठ लिपीक इरफान मुल्ला तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.