Views


*महिलांनी पुढे येऊन एकमेकांच्या सहकार्यातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात अग्रभागी रहावे, स्टुडन्ट हेल्पिंग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महिलांनी पुढे येऊन एकमेकांच्या सहकार्यातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात अग्रभागी रहावे.भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्व असते या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असते परंतु सध्याचा समाज एकत्रीतपणातुन एकटेपणाकडे जात असल्याने या सणांचा उद्देश साध्य होत नाही.असे आवाहन स्टुडन्ट हेल्पिंग युनिटीच्या अध्यक्षा आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने दि.१२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत लोहारा शहरा करिता गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवारी दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे होत्या. या स्पर्धेत शहरातील अनेक स्पर्धकाने सहभाग नोंदवला. स्पर्धेतील प्रथम विजेत्या सुजाता नागनाथ जोगी यांना पैठणी, द्वितीय विजेत्या शिल्पा जनक कोकणे, जगदेवी दयानंद स्वामी यांना सोन्याची नथ, तृतीय विजेत्या सुनंदा दत्तात्रय फावडे,शिवगंगा भगवान बिराजदार,शरयू दिक्षित यांना प्रत्येकी 1 चांदीचे नाणे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून देण्यात आले. स्पर्धेतील सहभाग नोंदविलेल्या स्पर्धकांना उत्तेर्जनात प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले. यावेळी प्रथम नगराध्यक्षा पौर्णिमा जगदिश लांडगे, माजी नगरसेविका श्रीमती कमलबाई राम भरारे, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सारिका प्रमोद बंगले, गिरीजा चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्या मिरा फुलसुंदर, नागराळच्या सरपंच रितु गोरे, महिला आघाडीच्या तालुका उपप्रमुख पूनम लोभे यांची प्रमुख म्हणून उपस्थिती होती.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुवर्णमाला शामसुंदर नारायणकर यांनी केले. तर आभार शिवसेना महिला आघाडी शहर संघटक सुवर्णा फावडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, सरपंच नामदेव लोभे, माजी पं स सदस्य दिपक रोडगे, मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष भरत सुतार, माजी नगरसेवक शाम नारायणकर, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, महेबूब गवंडी, महेबूब फकीर, प्रमोद बंगले, श्रीशैल्य स्वामी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, दत्ता मोरे, प्रेम लांडगे, शिवा सुतार, आदींनी परिश्रम घेतले.
 
Top