Views
*ओबीसी जनमोर्चा च्या अध्यक्षपदी सचिन शेंडगे यांची निवड*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


ओबीसी जनमोर्चा च्या अध्यक्षपदी सचिन शेंडगे यांची निवड करण्यात आली आहे या त्यांना नियुक्तीचे पत्र प्रकाश शेंडगे यांनी दिले आहे या नियुती पत्रात असे म्हटले आहे की, ओबीसी जनमोर्चा ही इतर मागासवर्गीय शेतकरी, बलुतेदार अलुतेदार, भटक्या जमाती, विमुक्त जाती यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी गेली दोन वर्षे कार्यरत असणारी आणि ओबीसी/बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असणारी एक सामाजिक संस्था आहे. ओबीसीना संघटीत करून संविधानाने दिलेल्या त्यांच्या अधिकारासाठी जनजागृती करणे, त्य काटेकोर अंमलबजावणीसाठी शासनाकडे आग्रह धरणे, प्रसंगी आंदोलनात्मक पावले उचलणे किंवा न्यायालयीन लढाई लढणे व त्यासाठी त्यांच्यामध्ये प्रबोधन, प्रशिक्षण आणि परिवर्तन पडवून आणण्यासाठी प्रयवशील आहे. आपल्या संघटनेच्या बांधणीसाटी, मजबूतीकरणासाठी, ओबीसींचे प्रलंबित प्रश्न आणि नव्याने उभी ठाकलेली आव्हाने यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी तळागाळात पोहोचणे आहे. आपण ओबीसी/बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्षे मोलाचे योगदान दिले आहे. आपले सामाजिक क्षेत्रातील कार्य, अभ्यास, अनुभव आणि तळमळ लक्षात घेऊन ओबीसी जनमोर्चा आपली १ वर्षाकरीता उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करीत आहे.सचिन शेंडगे यांची नियुक्ती होताच त्यांना सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 
Top