Views
*बापूराव पाटील यांना श्रीशैलम पिठाच्या माध्यमातून सेवा करण्याची मिळालेली संधी म्हणजे मुरूमसह पंचक्रोशीचे मोठे भाग्य -- श्री ष ब्र डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्यरत्न महाराज*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


 पंचपीठावर नित्तांत श्रद्धा ठेवून कार्य करणारे त्याच बरोबर कुठल्याही कामाची वाच्यता न करता प्रत्यक्ष कृतीतून काम करण्याचे व्यक्तिमत्त्व बाळगणारे मुरूमचे सुपुत्र बापुराव पाटील यांच्या सारख्या निस्सीम भक्ताला श्रीशैलम जगद्गुरू पिठाच्या विश्वस्थ मंडळावर काम करण्यासाठी मिळालेली संधी म्हणजे मुरूम सह पंचक्रोशीतील जनतेचा बहुमान असल्याची भावना होटगी मठाचे श्री ष ब्र डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्यरत्न महाराज यांनी व्यक्त केली. मुरूमचे सुपुत्र बापूराव पाटील यांची नुकतीच श्रीशैलम जगद्गुरू पिठाच्या संचालक पदी निवड झाली आहे. यानिमित्ताने अशोक चौक गणेश मंडळ तसेच सुजित शेळके परिवाराच्या वतीने शनिवारी (दि 18) अशोक चौक येथे बापूराव पाटील यांचा होटगी मठाचे श्री ष ब्र डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती बापुराव पाटील,श्री शरनय्या स्वामी,युवानेते शरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज म्हणाले की, श्रीशैल्य मल्लिकार्जुन आणि सोलापूर शहरातील महान शरण श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचे गुरू शिष्याचे नाते आहे. उस्मानाबाद, लातूर,सोलापूर जिल्ह्यात श्रीशैल्य मल्लिकार्जुन यांचा भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात आहे.श्रीशैलम येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तनिवास, आरोग्य सेवा आदीसह सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने श्रीशैलम पिठाच्या वतीने आंधरप्रदेश सरकारकडे जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी विचारात घेत आंधरप्रदेश सरकारने 10 एकर जमीन देण्याची घोषणा केली आहे.यापुढील काळात श्रीशैल्य जगद्गुरू तसेच विश्वस्थ मंडळींच्या पुढाकाराने या ठिकाणी भक्तांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याच कालावधीत बापुराव पाटील यांची श्रीशैलम पिठावर संचालक म्हणून झालेली निवड म्हणजे सेवा करण्याची संधी आहे.ही संधी म्हणजे मुरूमसह पंचक्रोशीतील नागरिकांचा बहुमान असल्याचे मत व्यक्त करत बापूराव पाटील यांना उत्तरोत्तर समाजकार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना शरण पाटील म्हणाले की, सर्वधर्मसमभावनेची भावना जोपासणाऱ्या पंचपीठापैकी श्रीशैलम पिठावर संचालक म्हणून सेवा करण्याची काकांना मिळालेली संधी म्हणजे समस्त मुरूमकरांचा बहुमान आहे.श्रीशैलम येथे दर्शनासाठी जाणाऱ्या या भागातील भक्तांच्या सोयीसाठी जे कांही करता येईल यासाठी पाटील परिवाराच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे सांगून ऋण व्यक्त केले. नळदुर्ग येथील शिक्षक डॉ संतोष पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. देशमाने सर यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी उमरगा येथील विधिज्ञ व्ही.एस.आळंगे, संजय बिराजदार, मल्लिनाथ दंडगे, मुरूम पालिकेचे उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरूळे, रविंद्र कारभारी, युवक काँग्रेसचे महालिंग बाबशेट्टी, उल्हास गुरगुरे, गौस शेख, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल वाघ, सरपंच योगेश राठोड, श्रीहरी शिंदे पाटील, नगरसेवक रशीद शेख, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, सिद्धलिंग स्वामी, आयुब मासुलदार, इब्राहिम नदाफ, दिलीप शेळके, सुजित शेळके, अशोक चौक गणेश मंडळाचे सचिव रविकिरण अंबुसे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी,नगरसेवक, नगरसेविका व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
 
Top