Views
*माकणी येथे व्दारयुक्त सिमेंट बंधारा तयार करा --
आ.सतीश चव्हाण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला लोहरा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे. 
आ.सतीश चव्हाण यांनी दि.21 सप्टेंबर रोजी मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेतली. माकणी येथील निम्ण तेरणा प्रकल्पाच्या खालील बाजूस पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाची टंचाई असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी तेरणा नदीवर जुन्या माकणी गावठाणच्या जवळ एक व माकणी सास्तूर शिव रस्त्यानजीक एक असे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत माकणी येथे दोन सिमेंट बंधारा बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तसेच या अंदाजपत्रकानुसार त्वरीत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी शंकरराव गडाख यांच्याकडे केली. यासंदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश शंकरराव गडाख यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.
 
Top