Views
*लोकसहभागातून होळी ते मुर्शदपुर शेत रस्त्याच्या मातीकामास सुरुवात*


उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोकसहभागातून शेतकऱ्यांच्यावतीने लोहारा तालुक्यातील होळी ते मुर्शदपुर येथील 1 कि.मि. रस्त्याच्या मातीकामास सुरुवात करण्यात आली आहे. शिवारातील शेतकऱ्यांना पिकांना खत द्यायचा म्हटले तरी डोक्यावरून घेऊन जावे लागत होते. तसेच ऊस गाडी असतील किंवा शेतीची मशागत, आंतरमशागत करायची असेल तर शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याचे मातीकाम सुरु झाल्याने शेतकऱ्याची अडचण आता दूर होणार आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे मातीकाम हे या शिवारातील शेतकरी स्वखर्चातून करीत आहेत. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील, मा.चेअरमन होळी सोसायटी अंकुश गोपीनाथ जाधव, सरपंच सौ.सरोजा ओम बिराजदार, माजी सरपंच व्यंकट सिद्राम माळी, लक्ष्मण रमेश जाधव, राम बंकट बिराजदार, श्रीमंत तुळशीराम मोठे, श्रीपती जमादार, राजेंद्र जमादार, बलभीम हंकारे, प्रशांत कोकाटे, बळीराम सुरवसे, यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top