Views


*भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर आजारातुन तंदुरूस्त, संघटनात्मक कार्यात सक्रिय होणार -- लक्षवेध-राम कुलकर्णी*


उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला वेगवेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागतो पण मातृ पितृ पुण्याई तथा संचित कर्माची पुण्याई जर असेल तर मग कितीही संकटे आली तरी माणुस त्यातुन सहज तरून जावु शकतो.असा चमत्कार मराठवाड्यातल्या राजकिय पुढार्‍यांच्या बाबतीत घडलेला दिसुन येतो. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर गेल्या एक वर्षापासुन स्वत:च्या प्रकृती अस्वस्थामुळे आरोग्याची लढाई लढत होते. अखेर या सर्व संकटातुन त्यांचा पुनर्जन्म झाला. तंदुरूस्त आमदार आता संघटनात्मक कार्यात सक्रिय होत असुन काल त्यांनी उस्मानाबादेत जाहिर कार्यक्रमात लावलेली उपस्थिती कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र परिवारांना आनंद देणारी होती. परांडा जि.उस्मानाबाद या गावचे असलेले ठाकुर जन्मत:च संघ विचार परिवाराचे परिणामी लहानपणापासुन भाजपसोबत त्यांची नाळ जोडल्या गेली. तब्बल पंचेवीस वर्षे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यात त्यांनी काम केलं. जिल्हा, विभाग आणि प्रदेश पातळीवर संघटनात्मक कामात वेगवेगळ्या भुमिका त्यांनी बजावल्या. संघर्ष यात्रा आणि सुजित ठाकुर हे समीकरण महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे. हाडाचा कार्यकर्ता पक्ष तथा नेतृत्वावर असलेली निष्ठा, विकासाची तळमळ व सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेवुन जाण्याची कसब असे अनेक नेतृत्व गुण त्यांच्यात आहेत. विधानसभा निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका असो राज्य भाजपात त्यांची भुमिका महत्वाची राहिलेली आहे. लातुर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, बीड सर्व जिल्ह्यात त्यांनी संघटनात्मक काम केलेले असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान भरीव राहिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वैद्यकिय महाविद्यालय आणि सिंचन प्रश्नावर त्यांची आग्रही भुमिका फायद्याची ठरली. सहा फुट उंची, रूबाबदार चेहरा, उपजत सौंदर्य, राजबिंड नेतृत्व असलेले सुजितसिंह अचानक त्यांच्यावर आरोग्याचं संकट आलं आणि मागच्या वर्षी प्रकृतीत बिघाड झाला. कोरोना, एंजिओग्राफी, बायपास एका पाठोपाठ एक संकटं त्यांच्यावर आली. सोलापुर, मुंबईसारख्या शहरात नामांकित रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यानच्या काळात खालावलेली प्रकृती आणि त्यांची देहबोली कुटुंबासह हितचिंतकासाठी काळजीचा विषय ठरला होता. मात्र जी माणसं आयुष्यात चांगली कर्म करतात अशांच्या पाठीशी परमेश्वर खंबीरपणे उभा राहतो तसाच चमत्कार सुजितसिंह यांच्या बाबतीत घडला. आई-वडिल यांची पुण्याई संकटात कामी आली आणि बघता बघता यातुन ते बाहेर पडले. आज परिस्थितीत तबीयत तंदुरूस्त झाली आहे. गावी मुक्कामी असले तरी काल त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जाहिर कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती प्रेम करणार्‍यांसाठी आनंद देणारी ठरली. काही कालावधी गेल्यानंतर कदाचित पहिल्यासारखं ते सक्रिय निश्चित होते. पण माणसावर संकटे किती आणि कसे येतात?ज्यातुन अशी माणासं पुण्य कर्मामुळे क्रीयामान दालनात सक्रिय होतात. त्यात सुजितसिंह यांचा नवा अवतार दैवीकदृष्ट्या चमत्कार दाखवणाराच म्हणावा लागेल. भविष्यात परमेश्वर त्यांचे आरोग्य रक्षण करो. हीच आमची प्रार्थना.
 
Top