*ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणूका पुढे घेण्यात याव्यात -- भाजपा लोहारा तालुका*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणूका पुढे घेण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार राणा जगजित सिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, धुळे नंदुरबार अकोला वाशिम पालघर व नागपूर येथील निवडणुका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या व भिशी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. पण या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून-बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल दिला नाही. व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठली कारवाई केली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतील बाजूला केली म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा च्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. तरी तोपर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि. चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, एससी तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, काशिनाथ घोडके, कमलाकर सिरसाठ, पृथ्वीराज गव्हाणे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.