Views


*भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंहजी ठाकुरसाहेब व आ. राणाजगजितसिंह पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंहजी ठाकुरसाहेब व मा.आ. राणाजगजितसिंह पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्यात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. ओ बी सी बांधवांचे राजकीय आरक्षण प्रलंबित ठेऊन सहा जिल्ह्यांतील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न घेता जो पर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत होणार्‍या निवडणुका रद्द कराव्यात व ओबीसी आयोगाकडुन इम्पिरिकल डाटा घेऊन ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण द्यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा परंडा व भारतीय जनता पार्टी परंडाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी बांधवांना आरक्षण न देता निवडणूक घेण्याचा घाट घातला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी मोर्चा परंडा तालुक्याच्या वतीने निवेदनात दिला आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटिल, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अॅड.जहिरभाई चौधरी, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, अँड तानाजी वाघमारे, तुकाराम हजारे, अॅड विनोद गोडगे, अँड तानाजी गरड, शिवाजी काकडे - पाटील,श्रीमंत शेळके, सागर पाटिल, बाबासाहेब जाधव, संदीप शेळके, दादासाहेब गुडे, परशुराम कोळी, ब्रम्हदेव उपासे, राहुल जगताप, युसुफ पठाण, देवीदास जाधव, रणजित काकडे, मारुती ठवरे, गणेश पुरी, सतिश पाडुळे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top