Views




*जिल्हा परिषद केंद्र प्रमुखांच्या १५ विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघ शाखा उस्मानाबादच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रप्रमुख यांच्या १५ विविध मागण्यासाठी आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघ जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गिरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. केंद्रप्रमुखांचा जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश करावा केंद्रप्रमुखांना वर्ग २ ची गट शिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नती मिळावी केंद्रप्रमुखांना सेवानिवृत्तीच्या वेळेस अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ मिळावा शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-२ पदोन्नतीसाठी फक्त केंद्रप्रमुख यांचा विचार व्हावा पदोन्नती साठी ५० टक्के गुणांसह उत्तीर्णची अट शिथिल करावी कायम प्रवास भत्त्यात सुधारणा अभावित केंद्रप्रमुख यांना कायम करणे केंद्रप्रमुख यांच्या रिक्त जागा भरणे केंद्र शाळांची पुनर्रचना व नवीन केंद्राची निर्मिती करणे महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचा एक प्रतिनिधी प्रत्येक जिपच्या शिक्षण समितीवर सदस्य म्हणून घेणे केंद्रप्रमुख पदी पदोन्नती झाल्यामुळे अधिकार कर्तव्य व जबाबदाऱ्या या बाबींमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची एक वेतनवाढ द्यावी केंद्रप्रमुख यांच्या रिक्त जागांमुळे अतिरिक्त केंद्राचा पदभार असणाऱ्या केंद्रप्रमुख यांना अतिरिक्त पदभार वेतन मिळावे केंद्रप्रमुखांमधून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन केंद्रप्रमुख यांना गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्काराने गौरव करावा अभावित केंद्रप्रमुख यांना कायम करावे केंद्र प्रमुख पदी सरळ सेवा भरतीने भरण्यापेक्षा पदोन्नतीने जागा भरण्यात याव्या आदी मागण्यां या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना उस्मानाबादचे अध्यक्ष महादेव शिंदे पाटील प्राथमिक शिक्षक सेवा मंचचे जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागसेन शिंदे चंदन लांडगे शिक्षक समितीचे बशीर तांबोळी आदी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे 
  दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गिरी, एस. एच.चव्हाण, एस.एम‌.चौगुले, ए.एल.उगलमुगले, डी.एस. निर्मळे, ए.आर.नागटिळक, बी.व्ही.मंडलिक, पि.आर‌.शिंदे, एन.एन.नागले, जे‌.के‌.जागते, टी.आय.महाजन, एस.ए. सोलनकर, के.एस.दूधंबे, सुकेशनी वाघमारे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top