Views


*आमदार ज्ञानराज चौगुले यांनी निम्न तेरणा प्रेरणा प्रकल्पाची पाहणी करून जलपूजन केले*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा धरण पूर्ण भरल्यामुळे शेतकरी व पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेली पुढील एक वर्षाची पाण्याची गरज भासणार नाही. या अनुषंगाने दिनांक 27 सप्टेंबर रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या प्रकल्पास भेट देऊन पाहणी करून जलपूजन केले. सदर प्रकल्पावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याबाबत तहसीलदार यांना सूचना केल्या. तसेच महावितरण कडून सर्व अत्यावश्यक सेवा पूर्ण याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, तहसीलदार संतोष रुईकर, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपकार्यकारी अभियंता के.आर.येनगे, शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे, सरपंच विठ्ठल साठे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विनोद मुसंडे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर घोडके, दीपक रोडगे, काकासाहेब चव्हाण, युनुस पटेल, सचिन ढोणे, प्रशांत सूर्यवंशी, श्याम पवार, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन आलमले, सरदार मुजावर, प्रताप राजपूत, बिबीशन हाके, सहाय्यक अभियंता महावितरण रेड्डी, आदि, उपस्थित होते.
 
Top