Views


*नांदरी ता.तुळजापुर येथील तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात 470 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन सोमवार दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी, मौजे नांदुरी ता.तुळजापुर येथे सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा नांदुरी व परिसरातील सर्व वयोगटातील ४७० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
या शिबीराचे उद्दघाटन जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते झाला. या वेळी पं.स.सभापती सौ.रेणुकाताई इंगोले, पं.स.सदस्य चितरंजन सरडे, सिध्देश्वर कोरे, कविताताई कलसुरे, मा.सरपंच कसई, विजय शिंगाडे, उपसरचंप हनमंत पाटील, सदस्य गोविंद डोंगरे, नागनाथ कलसुरे, विकास भोकरे, लक्ष्मण सरडे, मंगरुळ प्रा.अ.केंद्राच्या डॉ. खोमने पाटील, सी.एच.ओ. डॉ.ङि.पी उपासे, भोजने जी.पी., मिनाक्षी कावडे, घोडके साहेब, केसर मुळे, मुख्याध्यापक साखरे सर, मुकरे मॅडम, मोरे मॅडम, विनोद दुपारभुडे, कुमार साखरे, श्री शैल्य राजमाने, परमेश्वर सरडे, व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सौरभ विश्वकर्मा, डॉ.रोहीत कोळी, डॉ.आनंद यादव, डॉ.स्वप्नील नायक, डॉ.परवीन सय्यद, डॉ.तेजस यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, रवी शिंदे, पवन, चव्हाण ईत्यादींदी परीश्रम घेतले.
 
Top