Views










*पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांना पुष्पाचे वर्षावात निरोप* 

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 उस्मानाबाद चे पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन यांची बदली मुंबई येथे झाल्या नंतर त्यांना उस्मानाबाद पोलिस दलाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून निरोप संभारंभ देण्यात आला.
 यावेळी फुलांच्या पायाघड्या व गुलाब पुष्पांचे वर्षाव करून पोलिस अधिकाऱ्याने परंपरे प्रमाणे गाडी ओढून बॅण्ड पथकाच्या वाद्यात निरोप दिला. या वेळी पावसाने सुद्धा हजेरी लावली आकर्षण फुलाने गाडी सजवली होती.

 पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांची उस्मानाबाद येथील कारकीर्द ही चांगली राहिली. त्यांना उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्राचे गृहमंत्री पदक मिळाले तसेच त्यांनी केलेल्या तपासावर पुस्तक व त्यांच्या कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. रोशन यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात मिसिंग केसेस( हरवलेले व्यक्ती शोधणे) याबाबत शोधण्यासाठी द्यावयाची शोध कार्यपद्धतीची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली. रोशन यांनी यापूर्वी प्रशिक्षणार्थी काळात उस्मानाबाद जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून 2015 मध्ये काम केले होते. त्यानंतर पुन्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले दोन वेळेस उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

   या कौटुंबिक निरोप समारंभात उप विभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक मित्र परिवार उपस्थित होते. 
      उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांची बदली उपायुक्त म्हणून मुंबई शहर येथे झाली आहे.त्यांच्या ठिकाणी उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक म्हणून निवा जैन यांनी आज पदभार घेणार आहेत. जैन यांची समावेशक राज्य राखीव पोलीस बल गट. १ पुणे येथून पोलीस उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे जैन यांच्या रुपाने उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथमच महिला पोलीस अधीक्षक पदाचा मान मिळणार आहे.
 
Top