Views




*फार्मासिस्ट डे निमित्त लोहारा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने  
केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील एक महत्वाचा दुवा फार्मासिस्ट (औषध निर्माता) प्रत्येक वर्षी २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक औषध निर्माता दिन मानला जातो. कोव्हिडच्या काळात फार्मासिस्टने मोलाचे कर्तव्य बजावले आहे. कठोर परिश्रम आणि समाजातील योगदाना बद्दल ग्रामीण रुग्णालय लोहारा यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गोविद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.संदीप हुपळे यांनी लोहारा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांचा फार्मासिस्ट डे निमित्त गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. लोहारा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील सर्व रूग्णांना केळी, सफरचंद, संत्रीचे वाटप करण्यात आले. कोरोना संकटाच्या अत्यंत कठीण काळात डॉक्टरांनी दिवस रात्र एक करून कामे केली आहेत. त्यानिमित्त केमिस्ट असोसिएशनच्या वतीने ही रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ औषध निर्माता बाबुराव पवार, प्रमोद बंगले, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार, दिपक मुळे, सचिन बिराजदार, गणेश हिप्परगे, विकास होंडराव, विक्रम जावळे, गणेश सारंग, अविनाश भुजबळ, जावेद मुजावर, सतीश दबडे, अल्हाबक्ष बागवान, खंडू शिंदे, सोमनाथ माळी, उमेश देवकर, कृष्णा घोडके, बिलाल बागवान, प्रवीण अभगराव, घोडके सिस्टर, लोंढे सिस्टर, बाप्पा वाघमारे, तुकाराम परसे, योगेश गायकवाड, लक्ष्मण सगट, इत्यादी उपस्थित होते.
 
Top