Views


*हराळी ग्रामपंचायतीच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे व नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांचा हराळी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. हराळी हे गाव माजी सैनिकांचे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात ओळख आहे. यावेळी हराळीचे उपसरपंच रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी, युवराज पाटील, रमेश सुर्यवंशी, भैय्यासाहेब धाडवे, सुनील रणखांब, दगडू सय्यद, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, श्रीराम धानुरे, अनिल बिराजदार, आदि, उपस्थित होते.
 
Top