Views


*महादेव कारभारी यांची शिवा लिंगायत युवक संघटना लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुका भाजपाच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा लिंगायत युवक संघटना लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, ‌तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, एसी,सी मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top