उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब म्हणजे चिंचपुर बुद्रुक च्या विकासाच सुवर्ण पर्व सुरुवात करणारे दैवत. चिंचपुर बुद्रुक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखेत ची स्थापना 30 डिसेंबर 2016 ला झाली भारतीय जनता पार्टी शाखा स्थापन झाल्यापासून चिंचपुर बुद्रुक मधे खऱ्या अर्थाने विकास कामांना सुरुवात झाली.बिन रस्त्यांचं गाव ही गेले 70 वर्ष चिंचपुर बुद्रुक ची ओळख होती ती ओळख माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी पुसण्याच काम केला. यामध्ये प्रमुख दोन रस्त्यांचं काम करण्यात आला.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून आंबी ते सक्करवाडी मार्गे पठाड रस्ता व अकबर फाटा ते जिल्हा सरहद्द रस्ता त्याचबरोबर इतरही काम चिंचपुर बुद्रुक मध्ये झाली. पण ग्रामपंचायत चिंचपुर बुद्रुक भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नसल्यामुळे अनेक विकासकामांना अडथळा येऊ लागला. ग्रामपंचायतची निवडणूक २०२१ लागली आणि दुर्दैव असं की माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब आजारपणामुळे संपर्कात नव्हते व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार नव्हतं याच गोष्टींचा विरोधकांनी फायदा घेतला आणि गावातील जुने एकमेकांचे सर्व कट्टर विरोधक काल राजकारणात आलेल्या भाजपाच्या पोरांचं राजकारण संपवण्यासाठी एकत्र आले, चिंचपुर बुद्रुक मध्ये राज्याच्या धर्तीवर महा विकास आघाडी स्थापन केली गेली. पण चाळीस वर्ष खडकाला धडका घेऊन निर्माण झालेले नेतृत्व आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांचे शिष्य कोणत्याच गोष्टींना अजिबात घाबरले नाहीत.भारतीय जनता पार्टीचा झेंडा ग्रामपंचायत चिंचपुर बुद्रुक वर लावण्याचा निर्धार केला.(ग्रामपंचायत अर्ज भरण्यापासून भारतीय जनता पार्टीचा सरपंच व उपसरपंच होईपर्यंतचा रंजक इतिहास नंतर लिहिला जाईल) आणि या अटीतटीच्या लढती मध्ये भारतीय जनता पार्टीने सत्तर वर्ष काँग्रेस /राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यात असलेल्या गडावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावला.हा विजय म्हणजे गेली चार वर्षे माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांनी चिंचपुर बुद्रुक मध्ये केलेल्या विकास कामांची पोचपावती होती.कार्यकर्त्यांच्या उत्साहाला कार्यकर्त्यांच्या विजयाला स्वतःची ऊर्जा माननार्या माननीय आमदार सुजितसिंग ठाकूर साहेबांना ग्रामपंचायत चिंचपुर बुद्रुक चा विजय अजारपणा मधे संजीवनी ठरली आणि आज प्रदीर्घ कालावधीनंतर साहेबांचे निष्ठावंत भाजपा युवा मोर्चा परंडा तालुका अध्यक्ष माननीय अनिल नारायण पाटील संपूर्ण ग्रामपंचायत टीम सरपंच, उपसरपंच,ग्रा.प. सदस्य गावातील भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते माननीय आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या भेटीला परांडा शहरामध्ये आले होते.यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य सतीश देवकर, सरपंच शिंदे, उपसरपंच सावंत, ग्रामपंचायत सदस्य महेश देवकर, भागवत शिंदे, प्रकाश सावंत, दत्ता सुतार, तसेच आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांचे समर्थक भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते अर्जुन आप्पा शिंदे, महावीर शिंदे, ऋषी शिंदे, भारत भिल्लारे, समाधान चव्हाण, बाबू दारूळे, नरेंद्र गायकवाड, सागर मल्हरे, सोमा सुतार, संजय अनभुले, तानाजी कासारे, बाळू बोबडे,आबा गावडे सर्वांनी साहेबांची भेट घेऊन निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.