Views


*पत्रकार नीळकंठ कांबळे यांना पत्रकाररत्न पुरस्कार जाहीर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

मुळज (ता.उमरगा) येथील प्रा.श्यामराव रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा 'पत्रकाररत्न' पुरस्कार लोहारा शहरातील सकाळचे पत्रकार नीळकंठ कांबळे यांना जाहीर झाला आहे. प्रा.शामराव रघुनाथ चव्हाण वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा.शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील सात जणांची निवड करण्यात आली. यात समाजरत्न पुरस्कार- बाबा जाफरी, कृषीरत्न पुरस्कार- किशोर औरादे,शिक्षकरत्न पुरस्कार- पुष्पलता पांढरे, उद्योगरत्न पुरस्कार-नितीन होळे, पत्रकाररत्न पुरस्कार- नीळकंठ कांबळे, क्रिडारत्न पुरस्कार-प्रभाकर उळेकर तर ग्रंथसेवा पुरस्कार- प्रभावती स्वामी यांना जाहीर झाल्याची घोषणा गौरव पुरस्कार समितीचे प्रमुख अॅड. शीतल चव्हाण यांनी केली. डिसेंबर महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
 
Top