Views


*भाजपाचे युवा नेते रोहन दादा देशमुख यांनी सह्याद्री हॉस्पिटल व सह्याद्री फाऊंडेशन, सह्याद्री ब्लड बँकला सदिच्छा भेट*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपाचे युवा नेते रोहन दादा देशमुख यांनी दि.6 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद शहरातील सह्याद्री हॉस्पिटल व सह्याद्री फाऊंडेशन तसेच सह्याद्री ब्लड बँकला सदिच्छा भेट दिली. व कोरोनाना काळात रुग्णसेवा करून लोककल्याणकारी व लोकोपयोगी केलेल्या कामाबद्दल सह्याद्री समुहाचे प्रमुख डॉ.दिग्गज दापके देशमुख यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी रोहन दादा देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.दिग्गज दाबके देशमुख यांनी रोहन दादा देशमुख यांचा सत्कार केला.
 
Top