Views
*तानाजी दबडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जि.प.प्रा. शाळेतील शिक्षक व करजखेडा ता.जि.उस्मानाबाद येथील रहिवासी तानाजी दबडे यांना" शेक्षणिक दिपस्तंभ" राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शिक्षकदिनी जाहीर झाला. तानाजी दबडे यांच्या शेक्षणिक,सामाजिक,राष्ट्रिय कार्यातील भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.डिजीटल वर्ग, ज्ञानरचनावादी वर्ग,ई-लर्निंग, आँनलाईन शिक्षण, शाळा रंगरंगैटी,वृक्षारोपन,सांस्कृतिक कार्य,शैक्षणिक सहल, कोरोना जनजागृती,लसिकरण मोहिम,विविध शेक्षणिक उपक्रम,स्वाध्याय उपक्रम,गृहभेटी उत्कृष्ट बाल गंथालय निर्मिती वरील प्रमाणे शिक्षणक्षेञातील उल्लेखनिय व वैशिष्ट्येपूर्ण कार्याची दखल घेवुन शैक्षणिक दिपस्तंभ या संस्थेकडुन 2021 चा पुरस्कारजाहीर झाला आहे.यापुर्वी तानाजी दबडे यांना गाव,तालुका,जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्य.स.अध्यक्ष,केंंद्रप्रमुख मित्रपरिवार सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
 
Top