Views

*मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात
शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करावे -- जिल्हाधिकारी 
कौस्तुभ दिवेगावकर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 
येत्या 17 सप्टेंबर रोजी 73 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी कुठल्याही प्रकारचा शिष्टाचार भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आणि हुतत्मयांना अभिवादन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले आणि सर्व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 9 वाजता केला जाणार आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रम कोरोनाविषयक नियमावलीनुसार पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून प्रत्येक अधिका-याने प्रयत्न करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक शिष्टाचाराचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित आहे. कार्यक्रम स्थळी नागरिकांच्या आसनाची व्यवस्थित सुविधा असावी,परिसर स्वच्छ आणि सॅनेटाईझ करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असेल.लाऊड स्पीकर आणि शामियाना लावण्याबाबत कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तर विद्युत मंडळाने त्यादिवशी वीज पुरवठा सुरळीत राहील याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.सर्व सन्माननीय सदस्यांना वेळेवर निमंत्रण पत्रिका मिळतील, याची काळजी घ्यावी.तसेच कार्यक्रमस्थळी आरोग्य पथक आणि रुग्णवाहिका तत्पर असणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.दिवेगांवकर यांनी यावेळी सांगितले.
 
Top