Views




*जिल्ह्यातील तरुणांनी उद्योगधंदे आणि व्यवसायात सक्रिय व्हावे--नितीन काळे*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे नानासाहेब लोखंडे यांच्या श्री स्वामी समर्थ सिमेंट प्रोडक्शन या सिमेंट प्रोडक्शन कंपनी चे उदघाटन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनपर बोलत असताना नितीन काळे म्हणाले की, तरुणांनी उद्योग धंदे, व व्यवसायात सक्रिय झाले पाहिजे, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक योजनांचा प्रारंभ झाला असून, ज्यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना, ईमुद्रा, कृषिवर आधारित उद्योग, यम.यस.यम.इ., डी.आय.सी., मार्फत चालविण्यात येणारे उद्योग तसेच छोटे मोठे व्यवसाय यामध्ये आतापर्यंत अनेक तरुणांनी लाभ घेतला असून कोरोनासारख्या महामारीत देखील छोटे मोठे उद्योग व व्यवसाय उभे केले आहेत तर आपणही अशा योजनेचा लाभ घ्यावा असे नितीन काळे म्हणाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एक संकल्प केला असून ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व 1491 बूथ असून प्रत्येक बूथ मधील 1 महिला व 1 पुरुष याना व्यवसाय तसेच छोटे मोठे उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करत आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, आणि यामध्ये सरकार कडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी हे सर्व अडचणीत मदत करतील, व तो उद्योग व्यवसाय सुरु होऊन उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण सुदृढ व सक्षम करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन नितीन काळे यांनी केले. या कार्यक्रमास संजय पाटील, संताजी वीर, सावता माळी, सतीश वैद्य, संतोष क्षीरसागर, किरण पाटील, नितीन बंडगर, बलराम कुलकर्णी, आशिष जोशी, शांतलींग ढोबळे, सुदर्शन जोशी, सचिन देशमाने, अनिल शेळके व खामसवाडी आणि गोविंदपूर भागातील नागरिक उपस्थित होते.
 
Top