Views
*कळंब मध्ये पोलिसांचे पथसंचलन*


कळंब/ प्रतिनीधी

श्री गणेश उत्सव सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दंगा काबू योजनेची रंगीत तालीम शहरातील सोनार लाईन येथे नुकतीच घेण्यात आली.
शुक्रवार (दि.१७) रोजी शहरातील सोनार लाईन, आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,साठे चौक, सावरकर चौक, होळकर चौक, बागवान चौक,कथले चौक, गांधी नगर, बसस्थानक आदी ठिकाणांहून हा रूट मार्च काढण्यात आला. कळंब पोलिस ठाणे अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील २६ गणेश मंडळांनी गणेश मूर्ती ची स्थापना केलेली आहे. गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने पार पडावा, यासाठी रूट मार्च काढण्यात आला. दरम्यान लोकांमध्ये जनजागृती करून कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव विसर्जन शांततेत करण्याचे आवाहन कळंब पोलिस ठाण्यात चे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले.
 
Top