Views




*ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती दिन स्मृती वाचनालयाचा शुभारंभ हिप्परगा रवा येथे मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व 75 व्या मराठवाडा मुक्ती संग्रामचे औचित्य साधून येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात आ.ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सुरु केलेले वाचनालयाचा शुभारंभ दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आ.ज्ञानराज चौगुले यांनी येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. या वाचनालयात साहित्यिक व स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन पुस्तक उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात या ठिकाणी भव्य असे वाचनालय उभे करून त्यातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास व या लढ्यातील हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळेचे महत्त्व या बाबतची सखोल माहिती लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले. यावेळी हैदराबाद मुक्तिसंग्राम पुस्तकांचे लेखक वसंतराव पोतदार यांच्या पत्नी सुशीलाबाई वसंतराव पोतदार यांच्यासह रूक्‍मीनबाई पंढरी मुळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष रजाक आत्तार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, सरपंच राम मोरे , माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, मुख्याध्यापक एस.बी.भुईटे, चेअरमन संतोष गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव जाधव, धर्मवीर जाधव, विजय पवार, रूक्‍मीनबाई होनाळकर, ज्ञानज्योती संस्थेचे विजय वडदरे, अमर सरगर, बी.के. पवार, सरपंच नामदेव लोभे, जगन पाटील, शहरप्रमुख सलीम शेख, जगदीश लांडगे, अभिमान खराडे, श्याम नारायणकर, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार, प्रेम लांडगे, शिवा सुतार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






 
Top