Views




*परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन धरणातुन खाली सोडले जाणारे अतिरिक्त पाणी आनाळा उपसा सिंचन मध्ये सोडण्याची भाजपाची मागणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन धरणातुन खाली सोडले जाणारे अतिरिक्त पाणी आनाळा उपसा सिंचन मध्ये सोडण्याची मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, परंडा तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या परंडा तालुक्यासाठी वरदान ठरणारा सिना कोळेगाव प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. हे धरण भरल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडे केले असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालु आहे. परंतु याच धरणावर अवलंबुन असणारा आनाळा उपसासिंचन प्रकल्पात सध्या अवघा ३० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. व या आनाळा उपसा सिंचन प्रकल्पातील पाण्यावर आनाळा, मुगाव, कार्ला, रत्नापुर, मलकापुर, वाटेफळ, इनगोंदा परिसरातील हजारो हेक्टर शेती अवलंबुन आहे. त्यामुळे सिना कोळेगाव धरणातील वाहुन जानारे अतिरिक्त पाणी आनाळा उपसा सिंचन योजनेत सोडले तर हा तलाव भरल्याने परिसतील शेती ओलीताखाली येणार आहे. तरी सिना कोळेगाव धरणातील वाहुन जानारे पाणी तात्काळ आनाळा उपसा सिंचन मधे सोडावे अशी मागणी तहसीलदार, परंडा यांच्या मार्फत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आ.सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, परंडा तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपा जिल्हा चिटणीस रामचंद्र कुलकर्णी, सरपंच जोतीराम क्षिरसागर, कांतीलाल पाटील, पत्रकार निशीकांत क्षिरसागर, सरपंच तुकाराम हजारे, शरद कोळी, अजित काकडे, चांगदेव चव्हाण, अजित शिंदे, सारंग घोगरे, श्रीकृष्ण शिंदे, बाळासाहेब गोडगे, जयंत सायकर, किरण कवटे, अनिल झिरपे, नवनाथ झिरपे, काका गटकळ, श्रीमंत शेळके, साजिद शेख, नवनाथ गटकळ, अंगद झिरपे, यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
 
Top