Views








*आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी लोहारा तालुक्यातील अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी दौरा करुन शेतकऱ्यांना धीर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.29 सप्टेंबर 2021 रोजी लोहारा तालुक्यातील अतिवृष्टी भागातील सास्तुर , माकणी, राजेगाव, वडगाव गांजा, वडगाव वाडी, हिप्परगा रवा, या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतात जाऊन विचार पूस करून शेतकऱ्यांना धीर दिला. या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन व सोयाबीन व ऊस या पिकात अक्षरशः पाणी थांबुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज करुन पोच घ्यावी, काय अडचण आल्यास मला संपर्क साधावा, मि तुमच्या मदतीला सदैव तयार आहे, असे सांगितले. शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ मिळावा अशा सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पिक विमा कंपन्याचे अधिकारी यांना केल्या. राज्य शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई नाही दिली तर आंदोलन करु असे सांगितले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सुनिल माने, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, सहाय्यक गटविकास अधिकारी कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हतरगे, सरपंच सुरेश देशमुख, सरपंच यशवंत कासार, ग्रामसेवक एस.ए. मोरे, कृषी सहाय्यक बाळासाहेब बिराजदार, पोलीस पाटील प्रदिप पाटील, अभिमन्यु देशमुख, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, पिकविमा कंपन्याचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top