Views




*उस्मानाबाद शहरात ओबीसी राजकीय आरक्षण समर्थनार्थ भाजपच्या वतीने निर्दशने आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


निवडणूक आयोगाने काल धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला व नागपुर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणा शिवाय पोटनिवडणूका जाहिर केल्या. राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळेच आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आलेली आहे. या ओबीसी विरोधी महाभकास आघाडीच्या विरोधात व निषेधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी सरकरच्या निषेधार्थ घोषणा बाजी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी समाज बांधवांनी मोठया प्रमाणात आक्रोश व्यक्त केली. हे आंदोलन भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती पण या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरिकल डेटा दिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध या पुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. याप्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड खंडेराव चौरे, नेताजी पाटील, सुनील काकडे, इंद्रजीत देवकते, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, रामदास कोळगे, पिराजी मंजुळे, राजसिंह राजेनिंबाळकर, प्रवीण सिरसाठे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, दत्तात्रय देवळकर, संदीप कोकाटे, अभिराम पाटील, अभय इंगळे, दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, सुजित ओव्हाळ, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, बालाजी कोरे, विनायक कुलकर्णी, आशिष नायकल, पांडुरंग पवार, मनोज रनखांब, नामदेव नायकल, प्रशांत रणदिवे, कुलदीप भोसले ,वैभव हांचाटे, विनोद निंबाळकर, अमोलराजे निंबाळकर, प्रीतम मुंडे, अर्चनाताई अंबुरे, विद्या माने, देवकण्या गाडे, गणेश एडके, हिम्मत भोसले, अमित कदम, सुरज शेरकर, प्रसाद मुंडे, पोपट राठोड, गिरीष पानसरे, बबलू शेख, सुनील पांगुडवले, सागर दंडणाईक, तेजस सुरवसे, तसेच शहर व ग्रामीण भागातील भाजपचे, ओबीसी मोर्चाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top