*समर्थ बूथ अभियान अंतर्गत परांडा तालुक़ा १४० बूथ पूर्ण करुन १००% काम पूर्ण केल्याबद्दल सत्कार*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
भारतीय जनता पार्टी परंडाच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान राबविण्यात आले. यामध्ये परंडा तालुक्यातील १००% काम पुर्ण झाल्याबद्दल भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर साहेब, मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कौडगे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थित परंडा भाजपा तालुक्याचा सत्कार करण्यात आला. पक्ष श्रेष्ठींच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन परंडा तालुक्यातील 140 बुथसमिती गठीत करण्यात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे बहुमोल योगदान आहे. परंडा तालुक्यातील सर्व शक्तिकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख, प्रत्येक गावातील भाजपा प्रेमी,भाजपाचे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,सर्व आघाडी व मोर्चाचे पदाधिकारी,सर्व तालुका पदाधिकारी,सर्व जिल्हा पदाधिकारी,व विशेषतः सर्व मा. आ.सुजितसिंहजी ठाकुरसाहेबांचे प्रत्येक गावातील निष्ठावंत कार्यकर्ते या सर्वांच्या बहुमोल अशा योगदानामुळे आज परंडा तालुक्यातील भाजपाची संघटना मजबुत होत आहे आजचा सत्कार हा संघटनेत योगदान केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. भारतीय जनता पार्टी परंडा, भारतीय जनता युवा मोर्चा ,परंडा तालुका सर्व मोर्चा व आघाडी यांचे पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, परंडा तालुका बुथ समन्वयक गणेशबप्पा खरसडे, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अॅड.जहिर चौधरी, उपस्थित होते.