Views




*कार्यकर्त्यांचा उत्साह हीच माझी ऊर्जा -- भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


कार्यकर्त्यांचा उत्साह हीच माझी उर्जा आहे, आपण ज्या उत्साहाने आजवर भाजपाच्या बुथवर पक्षाची बांधणी केली आहे त्याच्या बळावर हा जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून राज्यात गणला जाईल... याकार्यात मी व आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या साथीने सदैव कार्यकर्त्यांच्या सोबत पुन्हा त्याच जोमाने सक्रिय सहभागी होणार आहे. असा जबरदस्त आत्मविश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केला ते भाजपा बुथ प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान राबविण्यात येत आहे, या अभियाना अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा भाजपा बुथप्रमुख बैठक पार पडली. या बैठकीला मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हा प्रभारी रमेश पोकळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना आ.सुजितसिंह ठाकुर यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आवर्जून उल्लेख केला. या जिल्ह्यातील सर्व निवडणुका यापुढे फक्त भाजपा म्हणून लढवायच्या आहेत आणि त्यामुळे काम करेल त्या कार्यकर्त्यांना भरपुर संधी मिळेल असे ते म्हणाले, त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी दिलेले प्रेम व आशीर्वादाच्या बळावर पुन्हा त्याच उत्साहाने मी पक्षाच्या सेवेत रूजू होत आहे आपण सर्वांनी मिळून भाजपाच्या सरकारने केलेले काम जनतेच्या दरबारात मांडुया.... आज शेतकरी संकटात आहे, मंत्रिमंडळातले अनेक नेते महिलांवर अत्याचार करत आहेत, कोणाचा पायपोस कोणाला उरलेला नाही... जनता त्रस्त झाली आहे आता ही त्रस्त जनताच या तिघाडीला उलथवून टाकेल असे वक्तव्य केले. यावेळी मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी बुथप्रमुख व बुथकमेटी बांधणीचा तालुकानिहाय आढावा घेतला. तत्पुर्वी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जो कार्यकर्ता पक्षाला वेळ देऊन हे अभियान अधिक यशस्वी होण्यासाठी योगदान देईल त्याचा पक्षात योग सन्मान केला जाईल असे वचन कार्यकर्त्यांना दिले तसेच मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी बैठकीला मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, खंडेराव चौरे, व्यंकटराव गुंड, संताजीराव चालुक्य, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, रामदास कोळगे, सरचिटणीस नितीन भोसले, माधव पवार, प्रदीप शिंदे, आदम शेख, सुरेशबप्पा कवडे, संतोष बोबडे, लोकसभा समन्वयक शिवाजीराव गिड्डे, इंद्रजित देवकते, राहुल काकडे, सुनील काकडे, लक्ष्मण माने, निहाल काझी, ऍड.जहीर चौधरी, नगरसेवक प्रविण पाठक, जोत्सना लोमटे, अर्चना अंबुरे, सुलोचना वेदपाठक, विनायक कुलकर्णी तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, कैलास शिंदे, सचिन इंगोले, अजित पिंगळे, राजेंद्र पाटील, इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, राजीव मिनियार, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी होते. बैठकीची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.
 
Top