Views






*अतिवृष्टी बाधित शेतकरी व व्यवसायिकांना तातडीची मदत जाहीर करावी. - माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील -- माजी जि.प.उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या अर्चनाताई पाटील यांचे पालकमंत्र्यांना निवेदन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तेरणा नदीकाठचा असणाऱ्या तेर गावात बस स्टँड,ग्रामीण रुग्णालय,गोरोबा काका मंदिर परिसर,पेठ,गोदावरी या ठिकाणी पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी जिल्ह्यात दौऱ्यावर असलेल्या पालक मंत्री महोदयांना निवेदन दिले. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे,त्यामुळे राज्य सरकारने सरसकट तातडीची मदत जाहीर करावी. नुकसान झालेले छोटे दुकानदार, व्यवसायिक, बाधित झालेल्या नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी. पुरामुळे अतिवृष्टी व परिसरातून नागरिकांना तातडीची मदत जाहीर करून सहकार्य करावे, अशी मागणी राज्य सरकारकडे पालक मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गावात पूरजन्य परिस्थिती सारख्या संकटात निवारा मिळावा आणि गावात येणाऱ्या भाविकांसाठी आश्रयाची सोय व्हावी, या दृष्टीने यात्री निवासाच्या कामास निधीची तरतूद करावी. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात तेर नगरीचे व परिसरातील नुकसान म्हणजे ऐतिहासिक नुकसानच आहे. या पुरात गावातील पूलाची व रस्त्यांची दुर्दशा झाली झाली आहे. 2515 निधी अंतर्गत खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करुन सहकार्य करावे. तेरणा नदी पात्राचे खोलीकरण झाले असून तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत तेरणा नदीवर घाट बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पालक मंत्री महोदयांना निवेदनातुन केली आहे. तेर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन दुरुस्तीसाठी निधीची मागणी निवेदनात केली आहे. यावेळी तेर गावचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रवी चौगुले, ग्रा.प. सदस्य इरशाद मुलाणी, प्रभाकर शिंपले, सुरेश माने, बापु नाईकवाडी, विठ्ठल कोकरे, बबलु मोमीन, बालाजी पांढरे, भास्कर माळी, मंगेश फंड, भारत नाईकवाडी, श्रीमंत फंड, प्रजोत रसाळ, सुमेध वाघमारे, विलास रसाळ, विठ्ठल लामतुरे, प्रविण साळुंके, अजित कदम यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top