*चांदवड येथे आरोग्य उपकेंद्र मंजुरीच्या मागणीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सकारात्मक प्रतिसाद*
*भूम_परांडा_वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी केले होते मागणी.*
भूम/ नवनाथ यादव
या बाबत अधिक माहिती अशी की,भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.राजेश भैय्या टोपे यांच्याकडे चांदवड तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली होती. सदरील मागणीच्या प्रस्तावास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत .सदरील उपकेंद्रास मंजुरी मिळाल्यास चांदवड जवळील घाटनांदुर, ईराचीवाडी, अंजनसोंडा या ठिकाणी अशा लोकांची गैरसोय होणार नाही.