Views


*भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे उद्याचे 
भाजपचे नेते असतात -- आ.सुजितसिंह ठाकुर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उद्याच्या भाजपाचे नेते असतात,मी स्वतः युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो प्रदेशाध्यक्ष म्हणुन काम केले ,जो कार्यकर्ता युवा मोर्चात जोमाने काम करत असतो त्यांचे पक्षातील स्थान उज्वल असते असे उर्जादायी वक्तव्य आ.सुजितसिंह ठाकूर साहेबांनी केले,ते भाजपाच्या बुथप्रमुख व बुथकमिटी मेळाव्यात बोलत होते. याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी आ.सुजितसिंह ठाकुर साहेबांचा स्वागतपर सत्कार केला. यावेळी मार्गदर्शन करताना मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी युवा मोर्चाचे जिल्ह्यातील कार्य जोरात सुरू असल्याचे गौरवोद्गार काढले,युवा मोर्चाने ज्याप्रकारे कोरोनाच्या काळात सेवाकार्य केले ते कौतुकास्पद आहे, तसेच सतत उपक्रम राबविताना जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय कामाचा ठसा उमटवल्याचा आवर्जून उल्लेख केला. राज्यातील ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी,युवक,मराठा समाज, OBC सर्वच समाजात विश्वासघाताची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्टंटबाजी करणाऱ्या आघाडीच्या विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांना युवा मोर्चाने बेनकाब केले तसेच आक्रमक कार्य सर्व मोर्चे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करावे लागेल अशी सुचना त्यांनी केली येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल असेही त्यानी आवर्जून नमूद केले. मा. ठाकुरसाहेब मोठया दीर्घ वेळेनंतर पुन्हा पक्षकार्यात सक्रिय झाल्याबद्दल युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी त्यांचा स्वागतपर सत्कार केला व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मा.आ.राणाजगजीतसिंहजी पाटील व मा.आ.सुजितसिंह ठाकूर साहेबांनी विश्वास टाकला याबद्दल धन्यवाद व्यक्त केले, या वर्षभरात सरकार विरोधात आंदोलन, उपक्रमशीलता,सेवाकार्य करताना भाजपाच्या सर्व जेष्ट पदाधिकारी व युवा मोर्चाच्या सहकारी पदाधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले,तसेच सर्व जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत संघटन निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला भाजयुमो प्रकास मकरंद पाटील ,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संताजी वीर , राहुल शिंदे, अभिराम पाटिल, रोहित दंडनाईक ,सरचिटणीस देवकन्या गाडे , गणेश देशमुख ,ॲड.कुलदीपसिंह भोसले,जिल्हा चिटणीस राज निकम ,गणेश इंगळगी ,गणेश एडके,श्रमिक पोतदार ,किशोर तिवारी ,ओमकार देशमुख , तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे ,भाऊसाहेब कुटे ,ओम नाईकवाडी,सोशल मीडिया संयोजक बालाजी जाधव ,सह संयोजक निलेश दिवाने ,सिद्धेश भोसले ,प्रसिद्धी प्रमुख बापू नाईकवाडी ,आत्मनिर्भर सह संयोजक सलमान शेख ,सुरज शेरकर ,सुजित साळुंके,गिरीश पानसरे ,सुनील पंगुडवाले , प्रसाद मुंडे,स्वप्नील नाईकवाडी,अजित खापरे ,हिम्मत भोसले ,सागर कदम ,अरविंद रगडे ,गणेश भोगील ,सागर दंडनाईक,दादूस गुंड ,सागर पारडे ,रोहित देशमुख ,अनिकेत कोळगे ,गणेश जमाले ,सचिन लोमटे ,अक्षय भालेराव , अभिजीत लोके ,शुभम कदम ,सुधीर घोलप व जिल्ह्यातील भाजयुमो पदाधिकारी ,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते .
 
Top