Views


*सासरच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन आलेल्या महिलेचे मन परिवर्तन केले*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

समाजा मध्ये कुटुंबातील वाद विकोपाला जात आहे. या मध्ये पती पत्नी मध्ये वाद होत आहेत.तर सासरी कुटूंब कलह वाढत आहेत.या मध्ये महीलांना सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक व शारीरिक त्रास होत.कधी कधी तर मारहाण केली जाते.आशाच वादाची पती विरोधात व सासरच्या मंडळीं विरोधात तक्रार देण्यासाठी परंडा पोलिस ठाण्यात दिनांक १५ सप्टेबंर रोजी दुपारी २ वाजता मनिषा वाघमारे नामक एक महिला दाखल झाली. परंतु पोलिस ठाण्यात कर्तव्य बाजावत असलेल्या लोणी बीट अंमलदार महिला पोलिस नाईक जिज्ञासा पायाळे यांनी पोलीस निरीक्षक गिड्डेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला समजून सांगत त्याचे मन परिवर्तन केले.तसेच महिलेच्या पतीस चौकशी केली.यावेळी सदर महिलेने पतीवर गुन्हा दाखल करायचा नाही फक्त माझ्या नवऱ्याला समजून सांगा असे म्हणाली संसार करण्यासाठी गुन्हा दाखल करणे हेच महत्त्वाचे नसून कधीतरी नवरा-बायकोच्या संसारात तडजोड असणे महत्त्वाचे आहे.हे परंडा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक जिज्ञासा पायाळे यांनी करून दाखविले. पायाळे यांच्या कर्तव्या ची सर्वत्र कौतुक होत आहे.




संसार करण्यासाठी गुन्हा दाखल करणे हेच महत्त्वाचे नसून कधीतरी पती पत्नी च्या संसारात तडजोड असणे महत्त्वाचे आहे


  जिज्ञासा पायाळे
लोणी बीट अंमलदार महिला पोलिस नाईक परंडा




जिज्ञासा पायाळे
लोणी बीट अंमलदार महिला पोलिस नाईक परंडा


 
Top