Views
*जिल्ह्यातील सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पीकांचे तात्काळ पंचनामे ई-पीक पाहणी ऐवजी प्रत्यक्ष पाहणी करुन शेतक-यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी -- आ.सुजितसिंह ठाकूर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पीकांचे तात्काळ पंचनामे ई-पीक पाहणी ऐवजी प्रत्यक्ष पाहणी करुन शेतक-यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात गत काही दिवसापासुन मोठ्या प्रमाणात पाऊस होत असुन शेतामध्ये उभ्या असलेल्या पीकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ब-याच गावात पाणी शिरल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उडीद, मुग, तुर, फळबागा, ऊस, सोयाबिन, टोमॅटो अशा शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या ई-पीक पाहणी करने हे तांत्रिक दृष्टया शक्य होत नसुन मोबाईल नेटवर्क व ईतर कारणाने हे जाचक होत आहे. तरी झालेली नुकसान पाहणी प्रत्यक्षरित्या करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन शेतक-यांना सरसकट भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
 
Top