Views




*उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबईला पोलीस उपायुक्त ( डीसीपी ) म्हणून बदली नवीन पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन*


उस्मानाबाद /प्रतिनिधी

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबईला पोलीस उपायुक्त ( डीसीपी ) म्हणून बदली झाली असून, पुण्याच्या श्रीमती नीवा जैन उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेणार आहेत. 
      राज तिलक रौशन यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला होता. गेल्या दोन वर्षात त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी वाजवली. तसेच कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले. 
     उस्मानाबाद तालुक्यात २०१५ मध्ये वाघोली येथे एक अनोळखी माहिलेचे शव आढळले . यात ओळख पटवणे अतिशय अवघड असताना राजतिलक रौशन यांनी तिच्या अंगातील कुर्ताच्या लेबल टॅगवरूनऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीकडून, असे कुर्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यादी व मोबाईल नंबर घेऊन त्या सर्व मोबाईलचे लोकेशन तपासले असता, एका मोबाईलचे वाघोली लोकेशन आढळले. एवढ्या तुटपुंज्या माहितीवरूनच मयत व आरोपीची ओळख पटवून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास कामाबद्दल पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी एसपी राजतिलक रौशन यांना सर्वोत्कृष्ट ‘अपराधसिध्दी’ प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले होते. 
   
नव्या पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यापूर्वी पुणे येथे राज्य राखीव पोलीस बलमध्ये समावेशक म्हणून कार्यरत होत्या. 
    उस्मानाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांची पोलीस अधीक्षक, दहशवादी विरोधी पथक, औरंगाबाद येथे बदली झाली आहे. 


डीवायएसपी मोतीचंद राठोड यांची ठाण्याला बदली 





उस्मानाबादचे डीवायएसपी तथा उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड यांची सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून ठाणे शहर येथे बदली झाली आहे तर भूमचे उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांची अप्पर पोलीस अधीक्षक , लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद येथे बदली झाली आहे. 
 
Top