Views



*बापूराव पाटील यांचा लातूरच्या अष्टविनायक मंदिर ट्रस्टकडून सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला



उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्री क्षेत्र श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या संचालकपदी निवडीबद्दल लातूर येथील अष्टविनायक मंदिर ट्रस्टकडून मंगळवारी (ता.२८) रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत बापूराव पाटील यांचा लातूरच्या अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदिप राठी यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीगणेशाची प्रतिमा भेट देऊन येथोचित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधीपक्षनेते शरण पाटील, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आदिनाथ सांगावे, संचालक शरणप्पा कलमले, व्यंकटराव गर्जे, रमेशचंद्र भुतडा, उद्योजक उदय लातुरे, विवेक रेड्डी, विजयकुमार चितकोटे आदींची उपस्थिती होती. यावेळी अष्टविनायक मंदिर ट्रस्ट, लातूरच्या वतीने श्रीशैलम येथे भाविकांसाठी भक्तनिवास व अन्नछत्र बांधण्याचा मानस असल्याचे प्रदीपकुमार राठी यांनी सांगितले. संचालक पाटील यांच्याकडे तसे पत्र देऊन आपले मागणी सादर केले.
 
Top